Maharastra Politics : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला अवघे काही तास उरलेत. सरकारला एक तासही वाढवून देणार नाही असा निर्वाणीचा इशारा जरांगेंनी दिलाय. मात्र अजूनही मराठा आरक्षणाबाबत अजूनही ना कोणता ठोस निर्णय झालाय ना कोणती घोषणा. त्यातच आता ओबीसी समाजानं (OBC community) सरकारला थेट कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय. सरसकट कुणबी प्रमाणपत्रं दिली तर कोर्टात सरकारला कोर्टात खेचणार असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी दिलाय.


सरकारची कोंडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा समाजावर ठोस निर्णय वा घोषणा नाही. कुणबी प्रमाणपत्रांसाठी पुरेसे पुरावे शिंदे समितीला मिळालेले नाहीत. शिंदे समितीला महिन्याभराचा कालावधी लागू शकतो. तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्यास कोर्टात जाण्याचा ओबीसी समाजाचा इशारा दिलाय. अशा परिस्थिती जातनिहाय जनगणनेशिवाय आरक्षणाची 52% मर्यादा ओलांडता येणार नाही. जातनिहाय जनगणनेला कमीत कमी वर्षभराचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे आता या सर्व परिस्थितीमध्ये सरकारची कोंडी झालीये, हे मात्र नश्चित...


ओबीसींचा इशारा


आरक्षणाच्या या चक्रव्युहात सरकारची कोंडी झाल्याचं चित्र उभं राहिलंय. मनोज जरांगे-पाटील मागे हटायला तयार नाहीत, उलट पुन्हा आमरण उपोषणाची तयारी त्यांनी सुरु केलीय.. त्यात सरकारनं दबावापोटी आरक्षण दिलं तर कोर्टात खेचणार असा इशारा ओबीसी महासंघानं दिलाय. त्यामुळे इकडे आड, तिकडे विहीर अशीच अवस्था सरकारची झालीय असं म्हणायला वाव आहे.


ओबीसी संघटना आणि सरकार यांच्यात महत्वाची बैठक झाली होती. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नका, असा सूर ओबीसी नेत्यांनी बैठकीत लावला होता. मराठा समाजाल सरसकट प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी संघटना आक्रमक होतील, अशा इशाराही यावेळी देण्यात आला होता. मराठवाड्यात अनेक मार्गांनी कुणबी प्रमाणपत्र वाटण्याचं काम सुरु आहे, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र ओबीसीमधून नको, अशी भूमिका कुणबी सेनेनं घेतलीय. तर विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेचाही त्यांनी निषेध केलाय.


अजितदादा vs मनोज जरांगे


कुणबींवरून अजित पवार विरुद्ध मनोज जरांगे असा सामना सुरू झालाय. मनोज जरांगेंच्या सभेला कुणबी का जातात? असा सवाल अजित पवारांनी आज कुणबी समाजाला केला. त्यावर आमची एकी पाहवत नाही का? असा उलट सवाल जरांगे पाटलांनी केलाय. आमच्यात फूट का पाडता?, अशी विचारणाही जरांगे पाटलांनी केलीये.