Religious Conversion Case : ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मुस्लिम धर्मांतराचा डाव कसा साधला जायचा याबाबत धक्कादायक माहिती समोर आली. याचं कनेक्शन थेट मुंबई आणि मुंब्र्यापर्यंत येऊन पोहचलं. मुंब्रा भागात सुमारे 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.  मोबाईल गेमींग जिहादप्रकरणातील आरोपी शहानवाजला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर मुंब्रा परिसरात 400 जणांचे धर्मांतर झाल्याबाबत मुंब्रा पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. 


गुजरातहून आलेल्या एका फोन कॉलमध्ये तब्बल 400 जणांचं धर्मांतर केल्याचा खुलासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंब्रा भागात सुमारे 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याची माहिती समोर आली. गाझियाबादचे पोलीस आयुक्त निपुण अग्रवाल यांनी या माहितीची पुष्टी केली. गुजरातहून आलेल्या एका फोन कॉलमध्ये तब्बल 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याचा उल्लेख होता. याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली होती. 


400 जणांच्या धर्मांतर प्रकरणी मुंब्रा पोलिसांचा खुलासा


400 जणांच्या धर्मांतराची कोणतीही तक्रार आपल्याकडे आलेली नाही असं स्पष्टीकरण मुंब्रा पोलिसांनी दिले. गाझियाबाद पोलिसांना सहकार्य केलं असही मुंब्रा पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ऑनलाईन गेमिंगचा मास्टर माईंड शहनवाजला मुंब्रा पोलिसांनी अलिबागमधून अटक केलीय. आता त्याच्या चौकशीतून अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. 


आरोपी TV वर बातम्या पाहता होता


मोबाईल गेमिंग जिहादप्रकरणातला मास्टरमाईंड शहानवाज खानचा अलिबागमधील सीसीटीव्ही समोर आला आहे. 10 जूनला रात्री साडे आठ वाजता शहानवाजने आपल्या भावासोबत लॉजमध्ये चेक इन केलं. त्यावेळी त्याने बनावट नंबर आणि चुकीचा पत्ता देऊन अलिबागमध्ये रूम बुक केली होती. तिथे एअरकंडिशन रुममध्ये राहून शहानवाज बातम्या पाहता होता. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली. 400 जणांच्या धर्मांतर प्रकरणात शहानवाज आरोपी आहे.


शहानवाजचा ताबा गाझियाबाद पोलिसांनी घेतला


मोबाईल गेमींग जिहादप्रकरणातला मास्टरमाईंड  शहानवाजचा ताबा गाझियाबाद पोलिसांनी घेतला आहे. ठाणे न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसांची ट्रान्झिट रिमांड देण्यात आली आहे. मुंब्रा पोलिसांनी अलिबागहून शहानवाजला अटक केली. 400 जणांच्या धर्मांतर प्रकरणातील शहानवाज मुख्य आरोपी आहे. गाझियाबाद, मुंब्रा ते अलिबागदरम्यान त्याने 6 सिमकार्ड बदलल्याची माहिती समोर आली. गाझियाबाद पोलिसांनी गाझियाबाद न्यायालयात हजर करण्यासाठी परवानगी मागितली होती. पुढील 3 दिवसांत गाझियाबाद न्यायालयात हजर करण्याचे आदेश ठाणे कोर्टाने गाझियाबाद पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, ठाणे ते गाझियाबादला नेताना योग्य ती सुरक्षा घेण्याचेही कोर्टाने आदेश दिले आहेत.