सागर आव्हाड, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Kopardi Rape Murder Case:  राज्यासह देशात गाजलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीने आज पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणात जितेंद्र शिंदे हा मुख्य आरोपी होता. जितेंद्र शिंदेने कारागृहातच आपले जीवन संपवले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आता येरवडा प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. 


येरवडा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र शिंदे मानसिक रुग्ण होता आणि त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार देखील सुरू होते, असं सांगितले जात आहे. तसेच या मृत्यु प्रकरणाची न्यायदंडाधिकारीय चौकशी होणार असल्याचं सांगितलं आहे.


जितेंद्र उर्फ पप्पु बाबुलाल शिंदे याने लोखंडी पट्टीलावरती टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कारागृह अधिक्षकांच्या हे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आरोपीचे शव खाली उतरवून पंचनामा करण्यात आला असून त्यानंतर ससून रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता मृतदेह पाठवण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनादेखील कळवण्यात आले. 


येरवडा प्रशासनाच्या माहितीनुसार,  आरोपी जितेंद्र शिंदे याच्या मानसिक आजारावर कारागृह मनोरुग्ण तज्ञ यांच्या सल्ल्याने नियमीत औषधोपचार चालू होता. या मृत्यू प्रकरणाची न्यायदंडाधिकारीय चौकशी होण्याबाबत मुख्य न्यायदंडाधिकारी पुणे यांना विनंती देखील करण्यात आलेली आहे.


काय घडलं नेमकं? 


13 जुलै 2016 रोजी संध्याकाळी पीडित मुलगी आजोबांच्या घरी 13 जुलै रोजी सायंकाळी पीडित मुलगी आजोबांच्या घरी मसाला आणण्यासाठी गेली.
मसाला घेऊन परत घरी येत असताना आरोपी जितेंद्र शिंदे याने तिला अडविले. त्यानंतर निर्भयावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. मुलगी घरी परतली नाही म्हणून तिच्या आईच्या सांगण्यावरून चुलत भावाने पीडितेचा शोध सुरू केला. तेव्हा त्याला बांधावरील लिंबाच्या झाडाखाली आरोपी जितेंद्र शिंदे उभा असल्याचे दिसले. त्यानंतर अन्य तिघाजणांनी त्याला पळताना पाहिले होते. 


14 जुलै रोजी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी आरोपीसोबत अन्य तिघाजणांवरही आरोपपत्र दाखल केले. 4 जुलै रोजी रात्री मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याला श्रीगोंदे येथून अटक करण्यात आली. 29 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.