रत्नागिरी : कोरोचा फैलाव रोखण्यास जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यश मिळत आहे. जिल्ह्यातील ५२ तपासणी अहवाल आज जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये साखरतर येथे प्रारंभी पॉझिटिव्ह निघालेल्या दोन  रुग्णांचे उपचारानंतरचे पहिले अहवाल आता निगेटिव्ह आले आहेत. पहिला अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या अहवालाची प्रतिक्षा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच चिपळुणातील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील दहा रुग्णांचे अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत. तसेच खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील चाळीस रुग्णांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.


दरम्यान, एकूण प्रलंबित ६८ अहवालापैकी ५२अहवाल आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. सर्व निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे आता सहा महिन्याच्या बाळाचा रिपोर्ट बाकी आहेत. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.