मुंबई : राज्यात आज कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. राज्यात आज तब्बल 25,833 रुग्णांचा नोंद झाली आहे. तर राज्यात गेल्या 24 तासात 58 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 12,174 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 1 लाख 66 हजार 353 वर पोहचली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात आतापर्यंत 21,75,565 जण कोरोना बाधित झाले आहेत. राज्यात सध्या बरे होण्याचं प्रमाण 90.79 टक्के इतकं आहे.  राज्यात सध्या 8,13,211 जण होम क्वारंटाईन असून 7,079 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.


- मुंबईत आज 2 हजार 877 रुग्णांची वाढ झाली आहे.


- कल्याण-डोंबिवली क्षेत्रात आज 565 रुग्णांची नोंद झाली आहे.


- नागपुरात आज तब्बल 3796 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत.


- जळगाव जिल्ह्यात आज 923 कोरोना बाधित रुग्ण आढळले. 


- हिंगोली - जिल्ह्यात 87 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.


- नांदेड - 24 तासात 625 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ


- जालना जिल्ह्यात 419 नवे रुग्णांची नोंद झाली आहे.


- अमरावती जिल्ह्यात 465 कोरोना बाधित रुग्ण वाढले आहेत.


राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे.