मुंबई : देशासह राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. परिणामी कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याचं पाहत आता प्रशासनही सतर्क झालं आहे. लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे कोरोनाचे नवे रुग्ण हे 35 ते 45 वर्षे वयोगटातील असल्याचं दिसून येत आहे. (Corona cases, youth, Mask use)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिशी ओलांडलेल्या वयोगटामध्ये संसर्गाचं प्रमाण पाहता सध्या सार्वजनिक आणि खासगी रूग्णालयात कोरोनाचे उपचार घेणाऱ्या तरूणांची संख्या अधिक आहे. 


कोरोनाच्या संसर्गाचं हे रुप पाहचा सार्वजनिक ठिकाणी वावरताना तरूणांनी मास्क लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. वेगवेगळ्या कारणांनी बाहेर जाणाऱ्या, प्रवास करणाऱ्या, तसंच गर्दीत वावरणाऱ्या वयोगटात या विषाणूचा संसर्ग अधिक असल्याचं दिसून आलं आहे. (Corona cases)


काय आहेत कोरोनाची लक्षणं? 
प्राथमिक स्वरुपात कोरोनाचा संसर्ग झाल्यास ताप, घसादुखी, सर्दी, डोकेदुखी तसंच इतर स्वरूपाची लक्षणं 35-45 या वयोगटात दिसून आली आहेत. 


कोणत्या ठिकाणी किती टक्क्यांनी वाढला कोरोना? 
कोरोना रुग्णसंख्यावाढीचे आकडे सध्या धास्तावणारे आहेत. राज्यातील रुग्णांमध्ये 130.84 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 7 दिवसांत रुग्णसंक्या लक्षणीयरित्या वाढली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे या जिल्ह्यांनी आरोग्य विभागाची चिंचा वाढवली  आहे. (Corona cases in maharashtra)


कुठल्या 5 जिल्हे हॉटस्पॉट ठरतायत आणि त्याठिकाणी किती टक्के रुग्णवाढ ?
पालघर- 350 टक्के रुग्णवाढ 
ठाणे - 191 टक्के रुग्णवाढ 
मुंबई - 135 टक्के रुग्णवाढ 
रायगड - 130 टक्के रुग्णवाढ 
पुणे - 50 टक्के रुग्णवाढ