मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या 2 लाखांवर गेली आहे. येथे गेल्या 24 तासांत 7,074 नवीन रुग्ण वाढले आहेत. राज्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 2,00,064 वर पोहोचली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 48 तासात महाराष्ट्रात 124 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांचा आकडा 8,671 वर पोहोचला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 83,295 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत 1,08,082 लोकं बरे झाले आहेत. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,163 नवीन रुग्ण आढळले आहेत. येथे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 83,237 वर पोहोचली आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे 4,830 लोकांचा मृत्यू झाला आहे.


मुंबईत 53,463 लोकं उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोनाचे सध्या 28,924 रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.


देशात कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आता दररोज सरासरी 20 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत आणि 400 हून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. देशात संसर्ग झालेल्या कोरोनाची संख्या आता 6,48,315 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 18,655 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 3,94,227 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.