रत्नागिरी : जिल्ह्या कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे.  रत्नागिरीत याआधी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडला होता. त्याचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. सध्या या रुग्णाच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे. आता काही दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर घरी सोडण्यात येणार आहे. कोरोनाबाधित रुग्णाला लवकरच घरी सोडले जाणार आहे. जिल्ह्यात ७५० जणांना होम  क्वारंटाईन करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्ह्याचा विचार करता कोरोना संशयितांचे स्वॅब घेण्याची सुविधा रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातच आहे. पण त्यानंतर चाचणी घेण्याकरता स्वॅब पुणे या ठिकाणी पाठवावे लागतात. सध्याच्या बाबतीत साऱ्या गोष्टी नियंत्रणात असल्या तरी वेळ पडल्यास जिल्हा रुग्णालय हे कोरोना सेंटर म्हणून सुरु करण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या इतर रुग्णांवर मात्र खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. 


सिव्हिल रुग्णालयात सध्याच्या घडीला कोरोनाशी करण्याकरिता १४ बेड्स तर, डेरवण येथे २००आयसोल्युशन बेड तयार करण्यात आले आहेत. जिल्हा सुद्धा व्हेंटिलेटर देखील कमतरता आहे.  जिल्हा रुग्णालय येथे पाच तर जिल्ह्याचा विचार करता केवळ ३४ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. आणीबाणीची  परिस्थिती उद्भवल्यास हाताळण्यासाठी सध्या सरकारी डॉक्टरांची कमतरता आहे, पण त्यानंतर मात्र खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.


दरम्यान,  दिल्लीतील  निजामुद्दीन मरकजमधील धार्मिक तबलिग-ए- जमातमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने अनेकांनी हजेरी लावली. यात  रत्नागिरी जिल्ह्यातील ८ ते १० जण आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाला कामाला लागली असून शोध मोहीम सुरु केली आहे. मात्र, कोण या कार्यक्रमला गेले याची ठोस माहिती देण्यात आलेली नाही.