मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. कोरोनाचे संकट दूर राहण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक नागरिक याला हरताळ पाळत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढतच आहे. कोरोना व्हायरसची मुंबईत आत्तापर्यंत १८१ जणांना लागण झाल्याचं समोर आले. तर १३ जणांचा बळी गेलाय. गेल्या १२ तासांत वरळी आणि धारावीत कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झालाय.  खबरदारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतले अनेक भाग सील करण्यात आलेत. वरळी, कांजूरमार्गमधला नेहरुनगर परिसर पोलिसांनी सील केलाय. तर धक्कादायक बाब म्हणजे एका खासगी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मायलेकाला कोरोनाची लागण झालीय. एवढं सगळं होत असताना नागरिक मार्केटमध्ये गर्दी करत आहेत. दादर, भायकळा येथील भाजी बाजारातही हीच परिस्थिती दिसून येत आहे.


रायगड जिल्ह्यात जप्तीची कारवाई


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि संचारबंदीचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्यावर कारवाई करण्यास सुरुवात करत अनेक वाहनांची जप्ती केली केली आहे. जिल्ह्यातील प्रमुख नाक्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. प्रेमाने सांगून उपयोग होत नाही. त्यामुळे दंदुक्याच्या धाक धाकवला तरी लोक ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने वाहन जप्तीची कारवाई सुरु केली असून  शेकडो वाहने ताब्यात  घेतली आहे.


उल्हासनगरात  ५० दुचाकी जप्त


उल्हासनगरमध्येही संचारबंदीचे उल्लंघन करण्यात येत आहे. कारवाई करताना पोलिसांनी ५० दुचाकी जप्त केल्या आहेत.
विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांनी दणका देण्यास सुरुवात केली आहे.


 नागपुरात अजून भाजी बाजारात गर्दी


राज्याची उपराजधानी नागपुरात अजून भाजी बाजारांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करताना दिसून येत नाही. महापालिकेनं शहरातील विविध भागात  ठोक विक्रेत्यांकडून भाजी विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलीय. मात्र तरीही नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झालेली पहायला मिळतेय. 



लातूर  शहरात मॉर्निंग वॉकला निघालेल्या ७० ते ८० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना भर रस्त्यात बसविण्यात आले. लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यापुढील रस्त्यावर सर्वाना सोशल डिस्टनसिंग करुन बसविण्यात आले.


औरंगाबादमध्ये पायी जाणाऱ्यांना शाळेत कैद


औरंगाबादमध्ये रस्त्यावरुन जाणाऱ्या काही लोकांना पोलिसांनी पकडलं, ही सगळी मंडळी गाड्या नसल्याने पायी घराकडे जात होती, त्यांना पकडून मनपा शाळेत थेट कैदेत टाकलं, आणि बाहेरुन कुलूप लावण्याचा अजब प्रकार घडला.  गेली तीन  दिवस ना पाणी न मूलभूत सुविधा अशा नरकयातना इथे ठेवलेल्या ५२ लोकांनी सोसल्या. प्रशासनाने पकडलेल्यांच्या खाण्याचीही सोय केली नव्हती. या ठिकाणी 'झी   24 तास' ची टीम पोहोचली. त्यानंतर तात्काळ प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले आणि चूक झालेली मान्य करत सुविधा देणार असल्याचं सांगितले. याबद्दल त्यांनी माफीही मागितलीय


शिर्डी साई संस्थाकडून हरताळ


साई संस्थानच्या अधिकाऱ्याची सोशल डिस्टसिंगची ऐसीतैशी पाहाय मिळत आहे.कोरोनाच्या पाश्वभूमीवर साईभक्तांना दर्शनासाठी  बंद करण्यात आल आहे मंदिरात कोणालाही जावू दिले जात नाही  ज्या़च काम आहे त्यांची धर्मामीटरने तपासणी केली जाते दुसरकडे सामाजिक अंतर पाळणे गरजेचे असता़ना काल मात्र साई मंदीरात तस केल गेल नव्हत मंदिरात अधिकारी कर्मचारी जवळ जवळ उभे होते. मिरवणुकीत सहभागी झाले होते कार्यकारी अधिकारी तर आपली पत्नी दोन मुली पुतण्या यांच्या सह सहभागी झाले होते.


काल ग्राम्थांनाही उत्सवीत सहभागी होता आल नव्हत आज मात्र संस्थानया अधिकाऱ्यांना जाग अल्याच दिसून आल मंदीरात आज सोशल डिस्टसिंग पाळण्यात आल्याच दाखविण्यात आलय काल कुटुबीयांना घेवून आलेले कार्यकारी अधिकारी आज चक्क मास्क लावून मिरवणुकीत सहभागी झाले होते.