मुंबई : Coronavirus : कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आज मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना संख्येची मर्यादा असणार आहे. तसेच राज्यात कोरोनाचा स्फोट, 24 तासांत 5 हजार 368 रुग्ण तर एकट्या मुंबईत तब्बल 3 हजार 928 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. (Corona crisis: Strict restrictions again in Maharashtra from midnight today)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेते, अभिनेते कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, भाजप नेते राधाकृष्ण विखे, हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अभिनेत्री नोरा फतेही, अर्जून कपूर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 


वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्यात आलेत. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे आजपासूनच हे निर्बंध लागू करण्यात आलेत. राज्यात राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध लागू करण्यात आलेत. केवळ 50 जणांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पाडावी लागणार 


अंत्यसंस्कारांना केवळ 20 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. पर्यटन स्थळं, समुद्र किनारे, गर्दी होणारी ठिकाणं अशा ठिकाणी निर्बंध लावण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेत. मात्र दुकानं, मॉल, सिनेमागृह यांविषयी अजून आदेश जारी झालेले नाहीत. राज्यात कोरोना रूग्णसंख्या कमालीची वाढत आहे. ओमायक्रॉनबाधितांसह कोरोना रूग्णांचे आकडे रोजच वाढत आहेत. त्यामुळे सरकारने अखेर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 


राज्यात कोरोनाचा उद्रेक


राज्यात कोरोनाचा उद्रेक झालाय. काल दिवसभरात राज्यात तब्बल 5 हजार 368 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एकट्या मुंबईत 24 तासांत कोरोनाचे 3 हजार 928 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याचं जवळपास स्पष्ट होतंय. ठाण्यात 864, पुण्यात 520 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यानं चिंता वाढलीय. दरम्यान राज्यात 24 तासांत आढळलेल्या 198 ओमायक्रॉनबाधितांपैकी 190 रुग्ण एकट्या मुंबईतून आहेत.