पुणे : Covid Updates: राज्यातील कोरोनाचा आकडा हा 10 हजारांकडे वाटचाल करत आहे. सध्या राज्यात 8 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. तसेच ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत आहे. अशीच रूग्णसंख्या वाढली तर नियम कठोर करु, तारतम्य बाळगा, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे. (Corona Crisis - Time for More Tough Decisions - Ajit Pawar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात 8,067 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. (Covid cases) राज्यात आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत 5,428 रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे अनेक ठिकाणी मास्क वापरला जात नाही, असे दिसून येत आहे. राज्यात कोरोनाची संख्या वाढत आहे. काही ठिकाणी गर्दी होत असून कोरोना खूप वेगाने पसरत आहे. त्यामुळे तारतम्य बाळगूबन वागा, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. रूग्णांची संख्या वाढत राहिली तर निर्बंध कठोर करावे लागतील असे ते म्हणाले.



दरम्यान, मुंबईत कोरोना रूग्णांपैकी 55 टक्के रूग्ण ओमायक्रॉनचे (Omicron) आहेत, असा निष्कर्ष कस्तुरबा जिनोम अहवालात आला आहे. हे रुग्ण मुंबईचेच रहिवासी आहेत. ओमायक्रॉनची पडताळणी करण्यासाठी महापालिकेने दोन दिवस 376 रुग्णांचे नमुने कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेत जनुकीय चाचणीसाठी पाठविले होते. यातील 282 रुग्ण हे मुंबईचे रहिवासी होते. ओमायक्रॉनबाधित 156 रुग्णांपैकी नऊ जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी कोणालाही लक्षणे आढळली नाहीत. यासोबत त्यांना प्राणवायू पुरवठा किंवा अतिदक्षता विभागातही दाखल करावे लागले नाही.