अहमदनगर : एक डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा वाजली. मुलांना शाळेत जायला मिळणार म्हणून आनंद व्यक्त करण्यात आला होता. मात्र सुरु करणं महागात पडलंय का? अहमदनगरच्या शाळेत कोरोनाचा स्फोट झाला आहे. नगरच्या एका शाळेत पुन्हा एकदा कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील भाळवणी इथल्या नवोदय विद्यालयात आणखीन 33 रुग्ण आढळून आल आहेत. दोन दिवसांपूर्वी याच विद्यालयातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर विद्यालयातील 428 जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली. 


तपासणीनंतर त्यात 33 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. या सर्वकोरोनाबाधितांवर पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


यापूर्वीही सापडले होते रूग्ण


यापूर्वी नवोदय विद्यालयात 19 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. या विद्यार्थ्यांना पारनेर इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. या विद्यार्थ्यांना ताप जाणवत असल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात 19 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 


कोलकात्यातील शाळकरी मुलांना कोरोनाची लागण


काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील एका शाळेत जवळपास 29 मुलांमध्ये कोविड-19 ची लागण झाल्याचं समोर आलं होतं. इयत्ता 9वी आणि 10वीच्या 29 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली होती. कोविड-19 ची लागण झालेल्या सर्व 29 विद्यार्थ्यांना खोकला आणि सर्दीची सौम्य लक्षणं असल्याने त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला होता.