धुळे जिल्ह्यात कोरोनाची धडक, एकाचा मृत्यू झाल्याने साक्री केले सील
लॉकडाऊनच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये धुळे जिल्हामध्ये कोरोनाने धडक दिली आहे.
धुळे : लॉकडाऊनच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये धुळे जिल्हामध्ये कोरोनाने धडक दिली आहे. जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण नव्हता. मात्र साक्री येथील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. या रुग्णाचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याने अधिकच खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा हादरु गेली आहे. साक्री शहरातील ज्या भागात हा रुग्ण राहत होता, त्याठिकाणी आरोग्य विभागाने सर्व परिसर सील केला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांना स्वतंत्र ठेवण्यात आले आहे.
संबंधित कोरोना बाधित रुग्ण हा हिरे वैद्यकीय महाविद्यालय जाण्याआधी खासगी रुग्णालयांमध्ये गेल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्या खासगी डॉक्टरांचा शोध सुरु आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाची संपूर्ण माहिती पोलिसांना अद्याप मिळू शकलेले नाही, पोलीस त्याच्या मोबाईलच्या आधारावर आणि कॉल डिटेलच्या माध्यमातून माहिती गोळा करीत आहेत. या घटनेनंतर मात्र संपूर्ण जिल्ह्यात सन्नाटा पसरला आहे. साक्री शहरात तर स्मशान शांतता दिसून येत आहेत.