लातूर :  शहरात मॉर्निंग वॉकला निघालेल्या ७० ते ८० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना भर रस्त्यात बसविण्यात आले. लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यापुढील रस्त्यावर सर्वाना सोशल डिस्टनसिंग करुन बसविण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी करण्यात आली आहे. तरीही काही लोक घरात थांबायचे नाव घेत नाहीत. घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हात जोडून आवाहन करत आहेत, कोरोनाला दूर ठेवायचे असेल तर घराबाहेर पडू नका, काळजी घ्या. मात्र, नागरिकांना याचे देणं घेणं नसल्याचे शहरात दिसून येत आहे. शहरात मॉर्निंग वॉकला निघालेल्या ७० ते ८० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १४४ आणि संचारबंदी आदेशांचं उल्लंघन करत फिरण्यासाठी हे सगळेजण घराबाहेर पडले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.



 लातूर शहरात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्यांवर कलम १८८ प्रमाणे होणार गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यापुढील रस्त्यावर सर्वाना सोशल डिस्टनसिंग करुन बसविण्यात आले. आतातरी नागरिक घराबाहेर पडणार नाही, अशी चर्चा शहरात सुरु आहे.