मुंबई : गेल्या वर्षी कोरोना ज्या वेगाने पसरत होता, त्याच्या किती तरी जास्त पटींनी कोरोनाचा संसर्ग 2021 मध्ये पसरू लागला आहे. ज्या वेगानं हा कोरोना हातपाय पसरतोय, ते अतिशय घातक आहे. भारतात १८ राज्यांमध्ये कोरोनाचा हा नवा स्ट्रेन सापडलाय. या कोरोनाची लक्षणेदेखील सतत बदलत आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या स्ट्रेनची काय आहेत लक्षणे?


जुन्या कोरोनाची ताप, चव, वास जाणं, श्वास घ्यायला त्रास, घशात खवखव अशी लक्षणं होती. तर ताप, कोरडा खोकला, अशक्तपणा, डोकेदुखी, जुलाब, अंगदुखी, त्वचेवर रॅशेस ही नव्या कोरोनाची लक्षणं आहेत.


हा नवा कोरोना आणि कोरोनाची दुसरी लाट अक्षरशः वा-यासारखी पसरतेय.


IIT कानपूरनं केलेल्या एका अभ्यासानुसार


1. फेब्रुवारी महिन्यात एक व्यक्ती शून्य लोकांना संक्रमित करत होती.
2. त्यात आता प्रचंड वाढ झाली आहे.
3. काही दिवसांमध्ये देशात रोज १ लाख रुग्ण वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
4. महाराष्ट्रात 15 एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे.
6. कोरोनाच्या पहिल्या लाटेत भारतात दिवसाला सर्वाधिक रुग्णसंख्या ९७ हजार ५०० एवढी होती.

दुसरी लाट यापेक्षा भयानक आहे. एप्रिल मध्यानंतर ही लाट कमी होईल असा अंदाज आहे. त्यामुळे मास्क घाला आणि सुरक्षित अंतर ठेवा.