कोरोचा कहर : राज्यात गेल्या 24 तासांत 54 हजार 22 नव्या रूग्णांची नोंद
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. गेल्या 24 तासांत 54 हजार 22 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 898 रूग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 37 हजार 386 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या 6 लाख 54 हजार 788 इतकी आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 74 हजार 43 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 3 हजार 39 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 4 हजार 52 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 71 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत अजून एकूण 49 हजार 499 सक्रिय रुग्ण आहेत.
कल्याण डोंबिवली क्षेत्रात 24 तासात सर्वाधिक 14 कोरोना रुग्णांचे मृत्यू झाला असून 714 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एका दिवसात 753 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 7 हजार 749 एवढी आहे.
जळगाव जिल्ह्यात आज 861 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 28 हजार 172 झाली आहे. आज 800 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्हात आज 16 कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू