मुंबई : राज्यात आज कोरोनाचे २३६१ नवे रूग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रात आता एकूण रूग्णसंख्या ७०,०१३ वर पोहोचली आहे. राज्यात आज ७६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा २३६२ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात ५,६७,५५२ लोकं होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. तर ३६,१८९ लोकं संस्थात्मक कोरंटाईन करण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात आज ठाणे जिल्ह्यातील ६०, नाशिक जिल्ह्यातील १, पुणे जिल्ह्यातील ९, औरंगाबाद जिल्ह्यातील ४, लातूरमधील १ तर नागपूरमध्ये १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 


कल्याण डोंबिवलीत आज सर्वाधिक ६२ रुग्णांची वाढ झाली असून एकूण रुग्णांची संख्या १०९६ वर पोहोचली आहे. तर आज २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


नवी मुंबई आज दिवसभरात ८० कोरोना रुग्ण वाढले आहेत. तर एकूण रुग्णांची संख्या २२८४ वर पोहोचली आहे.


पुण्यात दिवसभरात ५७ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून १६८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.