मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकंवर काढलं आहे. राज्यात आज 15 हजार 602 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तरप धक्कादायक बाब म्हणजे आज कोरोनाने 88 जणांचे प्राण घेतले आहे. तर राज्यातील मृत्यू दर 2.3 टक्के आहे.  राज्यात ऍक्टिव्ह रूग्णांची संख्या १ लाख १८ हजार ५२५ वर पोहोचली आहे. राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीत देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. आज कल्याण-डोंबिवलीत 409 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2 हजार 888 आहे. एका दिवसात 238 कोरोना बाधित रुग्णांना डीचार्ज देण्यात आला आहे. 24 तासात कोरोना बाधित 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे .



नागपुरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. नागपुरात आज 2 हजार 261 नव्या कोरोनाबाधितांची  नोंद करण्यात आली आहे.  शहरात 1 हजार 844 कोरोनाबाधितांची तर ग्रामिण मध्ये वाढले 415 कोरोना संक्रमीत आहेत. आज नागपुरात कोरोनाने 7 जणांचा बळी घेतला आहे. 


पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात एकाच दिवशी 42 जणांचे कोरोना रिपोर्ट  पॉझिटिव्ह आलेत. पुरंदर मधल्या 19 गावांमध्ये हे रुग्ण आढळलेत त्यामुळे तालुक्यात चिंतेचं वातावरण आहे.नीरा गावात तर एकाच घरातील 8 रुग्ण  पॉझिटिव्ह आलेत