Maharashtra Corona : राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ कायम
मुंबईत 33 टक्के कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली.
मुंबई : कोरोनाचा वाढता आलेख पुन्हा एकदा चिंता वाढवू लागलाय. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 4024 नवे रूग्ण आढळलेत. ही संख्या गेल्या दिवसाच्या तुलनेत 36 टक्क्यांनी अधिक आहे. त्याच वेळी, दोन रूग्णांचा मृत्यू झाल्याचीही नोंद करण्यात आली आहे. मुंबईत 33 टक्के कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली.
मुंबई महानगर पालिकेच्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आलंय की, बुधवारी शहरात कोरोनाचे 2,293 नवीन रुग्ण नोंदवले गेलेत, जे 23 जानेवारीपासून सर्वाधिक दैनंदिन कोरोनाची प्रकरणं आहेत. तसंच एका मृत्यूचीही नोंद झाली आहे.
बीएमसीच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 10,85,882 झाली आहे, तर मृतांची संख्या 19,576 वर पोहोचली आहे. मुंबईत 5 महिन्यांनंतर 2 हजार रुग्णांचा आकडा पार झाला आहे.
गेल्या 24 तासांत भारतात 8,822 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,32,45,517 वर पोहोचली आहे. बुधवारी आपली आकडेवारी जाहीर करताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या 53,637 वर पोहोचली आहे.