मुंबई : आज राज्यात कोरोनाचे तब्बल ९८९५ रुग्ण वाढले आहेत. राज्यात आज ६४८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १,९४,२५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.०९ % एवढे झाले आहे. 


राज्यात आज २९८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर ३.७ टक्के इतका आहे. आतापर्यंत झालेल्या १७,३७,७१६ चाचण्यांपैकी ३,४७,५०२ (२० टक्के) चाचण्या कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,७४,२६७ व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत तर ४५,२२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज एकूण १,४०,०९२ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.