पुणे : पुणेकरांच्या चिंता आणखी वाढणार आहेत. कारण आज दिवसभरात १५०४ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यात आज कोरोनाच्या 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये 6 रुग्ण हे पुण्याच्या बाहेरचे आहेत. दिवसभरात ६७५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ३५७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २,१३,०२५ वर पोहोचली आहे. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या  ८५४१ इतकी आहे. तर पुण्यात आतापर्यं एकूण ४९१७ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंतच एकूण १,९९,५६७ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. आज ८५५३ जणांचा कोरोना चाचणी करण्यात आली आहे.


पुण्यात कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. पुणे कोरोनाचं याआधी हॉटस्पॉट बनलं होतं. त्यामुळे पुणेकरांनी जर अजूनही गांभीर्य दाखवलं नाही तर पुण्यात ही कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.


पुण्यातच नाही तर राज्यात इतर शहरांमध्ये ही कोरोना रुग्णांमध्य़े झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ ही शासनासाठी चिंता वाढवणारी आहे. विविध नियम बनवले गेले असले तरी लोकांकडून ते पाळले जात नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.