नागपूर / नाशिक : राज्यात कोरोनाची  (Coronavirus) वाढती रुग्ण संख्या असूनही नागरिकांमध्ये गांभीर्याचं वातावरण दिसून येत नाही. नागपूर (Nagpur), नाशिकमध्ये ( Nashik) कोरोना नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे. नागपुरात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र तरीही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन बस वाहतूनक सुरु आहे. (Nagpur, flout social distancing norms)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फक्त 50 टक्के प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी असतानाही जास्त प्रवासी घेऊन जास असल्याचं उघड झाले आहे. याबाबत कारवाई करण्यात आली असली तरी नियमांना केराची टोपली का दाखवली जातेय याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोना नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी विक्रेते आणि ग्राहक मास्क लावताना दिसत नाही. मास्क लावण्यासाठी निर्बंध आणणारी सिक्युरिटी सुद्धा केवळ मास्क हनुवटीवर ठेवत आहेत.


देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ ही महाराष्ट्रात होत आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिले आहे. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात महाराष्ट्र सरकार जे काही प्रयत्न करत आहेत ते अपुरे पडत असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. लोक पूर्वीसारखे नियमांचं पालन करताना दिसत नाहीत असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मात्र अनेक जण निष्काळजीपणे वागताना दिसत आहेत.


नागपुरात मनपा प्रशासनाने स्टॅड अलोन स्वरुपातील किराणा,भाजीपाला, फळे,मांसविक्रीची दुकाने दुपारी 1 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचे आदेश दिलेत.तसेच एकाच ठिकाणी एकाहून अधिक असलेली किराणा दुकानं,भाजीपाला,चिकन मटन विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचंही आदेशात म्हटले आहे. त्यामुळं अत्यावश्यक  सेवा पुरविणारी दुकानं सोडली तर बाजारातील सर्व दुकानं बंद राहणार आहे. 


मुंबईत गेल्या 24 तासांत तब्बल 2 हजार नवे रुग्ण आढळून आलेत. कोरोनाचा धोका वाढतोय. मात्र नागरिक बेफिकीर असल्याचं दिसून येतंय. नागरिक नियमांचं पालन करताना दिसत नाहीयत. त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढताना दिसून येतोय. 


राज्यातली परिस्थिती चिंताजनक झाली आहे. मंगळावारी दिवसभरात 87 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर 17 हजार 864 रुग्ण वाढले. राज्यात करोना संसर्गाचा वेग आता जास्तच वेगानं होतोय. सध्या राज्यातल मृत्यूदर २.२६ टक्के आहे. तर 1 लाख 38 हजार 813 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.