योगेश खरे, नाशिक : चीन देशातील वूहान विषाणू प्रयोगशाळेतून कोरोनाचा प्रसार झाला अशी जगभरात चर्चा आहे, असे असताना राज्यात पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत जाणारे कोरोनाचे संशयितांचे नमुने महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या बसमधून असुरक्षित पद्धतीने वहन केले जात आहेत. राज्यभरात अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने आरोग्य विभाग विषाणूंचे बॉम्ब सध्या राज्यभरात फिरताना दिसत आहेत.  'झी२४तास'चा आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभाराचा हा पर्दाफाश. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्हा रुग्णालयातील कोरोना संशयितांच्या विलगीकरण कक्ष. या कक्षातील हे कर्मचारी संशयितांचे स्वॅप चे नमुने जमा करत आहेत. ज्या ठिकाणी आजूबाजूच्या नर्सेस आपलं पूर्ण शरीर कोरोना प्रतिबंधित ड्रेसने झाकून आहेत. त्याच ठिकाणी असलेले कुठलाही मास्क न घातलेला कर्मचारी वापरताना दिसत आहे. या संशयितांचे नमुने घेऊन हा कर्मचारी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेच्या म्हणजे एन आय व्ही लॅबला नेण्याची तयारी करताना आढळून आला.


एका थर्माकोलच्या बॉक्समध्ये या सर्व संशयित विषाणूंचे ट्यूब पॅकिंग करून एकत्र मागच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आलेत.  त्यानंतर हा बॉक्स घेऊन हा कर्मचारी पायी एसटी स्टँड वर निघाला. ठक्कर बाजार या बस स्थानकामधून पुण्याची बस पकडून हे महोदय आता पुण्याकडे रवाना झाले सुद्धा.


नाशिकमध्ये दररोज हे नमुने एनआयव्हीला पुण्याला पाठवल्या जातात आणि त्याचे रिपोर्ट येतात हेच नमुने आहेत जे संशयित ऍडमिट होत असतात त्यांचे या पद्धतीने पॅक केले जातात. हे नमुने पुण्याला पाठविले जातात. त्यासाठी एका कर्मचाऱ्याची निवड करण्यात आली आहे. मात्र, हा कर्मचारी कोणतीही सुरक्षा घेताना दिसत नाही.


पुण्यात कोरोना संशियांताचे नमुने घेवून जाणारे कर्मचारी सांगतात, आतापर्यंत मी चाळीसेक लोकांचे नमुने नेले आहेत, सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत आपल्याकडे एकही पॉझिटिव्ह नाही. आता नाशिकमध्ये पाच संशयित त्यांचे नमुने या बॉक्समध्ये आहेत. आता हे नमुने घेऊन मी जात आहे. नऊच्या गाडीने बसेल आणि रात्री दोन वाजता वाकडी ला उतरेल. त्यानंतर मी रिक्षाने पंधरा मिनिटात एनआयव्हीलॅब ला पोहोचेन.


हे सर्व काही आपल्याला नॉर्मल वाटेल. मात्र हा हा कर्मचारी विलगीकरण कक्षातून आलेला आहे. ज्या अवस्थेत बाहेर पडलाय जर कुणाला कोरोना झाला असेल तर त्यालाही कोणाचा संसर्ग होऊ शकतो. इतकच नाही तर बसमध्ये जाताना वा आजूबाजूच्या परिसरात जिल्हा रुग्णालयात फिरताना तो अनेकांना बाधित करू शकतो. मात्र याबाबत त्याला विचारले असता त्याने कुठलंही  काळजी करण्याचं कारण नसल्याचं स्पष्ट केले आहे.


दरम्यान, कोरोना चाचणीचे स्वाब ज्या ट्यूबमध्ये पाठवले जातात, तीन तुटणाऱ्या प्लास्टिक पासून बनवलेली असते, त्यामुळे ती प्रयोग शाळेत पाठवताना तुटण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे साथी रोग तज्ज्ञ अमोल गुप्ते, तज्ज्ञ डॉ. मोहन गुप्ते यांनी स्पष्ट केले आहे.


उद्या कोरोना संशयित रुग्णांचे घेतलेले हे नमुने जर दुर्दैवाने अपघातात फुटले तर काय होईल याचा विचार करा. वा एखाद्या चोराने चोरुन नेले तर त्याचा प्रसार कुठे कसा होईल याची काही शाश्वती नाही.  खरतर हे नमुने अति कडेकोट सुरक्षाव्यवस्थेतमध्ये प्रयोग शाळेत न्यायला हवे. एखाद्या अनुभवाप्रमाणे जैविक बॉम्ब असल्याची जगभरात या विषाणू बाबत चर्चा असताना किती हा अक्षम्य दुर्लक्ष पणा. नाशिक जिल्ह्यातील सिविल सर्जन मात्र यात कुठलाहीी धोका नसल्याचे सांगत सर्वत्र राज्यात याच पद्धतीने वहन करत असल्याचे सांगितले आहे.


नाशिकचे शासकीय सर्जन सुरेश जगदाळे सांगतात,  हे सर्वकाही नियमाप्रमाणे केले जात आहे. आम्ही जे नमुने घेतो ते त्रिस्तरीय ट्यूबमध्ये बंद करत असतो त्यामुळे यापासून काहीही धोका नाही. आतापर्यंत एसटी ने पाठवत होतो आता आम्ही स्वतंत्र शासकीय गाडीने पाठवत आहोत. राज्यात केवळ नाशिकच नाही ही तर अनेक जिल्ह्यातून राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेमध्ये हे नमुने येत आहेत. अशाच पद्धतीने राज्यभरातून कर्मचारी या प्रयोगशाळेत पोहोचत आहेत. रामभरोसे चाललेल्या या कारभाराकडे ना कुणाचे लक्ष आहे ना कुणाला चिंता. त्यामुळे सध्या राज्यात यात यासाठीचा पसरलेला भस्मासुर पाहता राज्य सरकारला अशा कारभाराची गंभीरतेने दखल घेण्याची गरज आहे.