पुणे : COVID-19 vaccine : राज्यात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) उद्रेक कमी झाला तरी धोका अद्याप संपलेला नाही. काही प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. आता कोरोना लसीकरण मोहीम (Corona vaccination campaign) तीव्र करण्यात येणार आहे. पुण्यात सलग 75 तास लसीकरणाचा कार्यक्रम राबवणार आहोत. पुण्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात लसीकरण कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

CSR फंडातून 5 लाख लशींचे डोस उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच CSR फंडातून खासदार अमोल कोल्हे यांनी लसीचे 5 लाख डोस उपलब्ध करुन दिले आहेत. लसीकरण मोहिमेसाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. दोन्ही लसींचे डोस घेतलेल्यांकडून नियमांचे उल्लंघन करु नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले.


पीएमसी मृत्यूदर 1.7 टक्के इतका झाला आहे. पीसीएमसीचा 1.5 इतका तर ग्रामीणचा 0.8 इतका झाला आहे. गेल्या आठवड्यात 5 लाख नागरिकांचे लसीकरण झाले. 5 टक्के लसीकरणात वाढ झाल्याचंही अजित पवार यांनी सांगितले.


दरम्यान, लस घेतल्यानंतर नियम मोडू नका, असे सांगताना पहिल्या डोसपेक्षा दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना होणाऱ्यांची संख्या जास्त का याबाबत डॉक्टरांना विचारले. त्यावर डॉक्टरांनी सांगितलं की, आपण दुसरा डोस घेतलाय तर नागरिक मास्क न घालता फिरतात. काळजी घेत नाहीत त्यामुळे असे होत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, कुटुंबाची आणि आपली काळजी घ्यावी अशी विनंती अजित पवार यांनी यावेळी केली.