भिवंडी: देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. ज्य़ेष्ठ नागरिकांना ही लस दिली जात आहे. याशिवाय ज्यांना अनेक आजारांनी ग्रासलं आहे आशा रुग्णांसाठी ही लसं देण्यात येणार आहे. दरम्यान लसीकरण केंद्रावर कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर धक्कादायक प्रकार घडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोव्हिड लसीकरण केंद्रात एक व्यक्तीचा दुसरा डोस घेतल्यानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील भाग्यनगर कामतघर इथे हा प्रकार घडला. 41 वर्षांच्या सुखदेव महिपती किर्दत यांचा मृत्यू झाला आहे. सुखदेव यांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्यांना चक्कर आली. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


उपचारासाठी सुखदेव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सुखदेव यांच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पतीचा मृत्यू कशामुळे झाला याची चौकशी करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. शवविच्छेदनानंतरच नेमकं कारण समजू शकेल अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. 


मुंबईत २९ मोठ्या खाजगी रूग्णालयांमध्येही आता कोरोना लसीकरणाला परवानगी दिली. लसीकरणासाठी आवश्यक असलेले निकष पूर्ण केल्यामुळे या रुग्णालय़ांना परवानगी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं परवानगी दिली आहे. मुंबई महापालिकेला पत्र लिहून लसीकरणासाठी पुढील प्रक्रिया राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


सीकरण सुरु असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये लसींचं पुरेसं वाटप करण्यास सांगितलं आहे. या साठ्याचं योग्य वाटप होतंय की नाही यावर लक्ष ठेवण्याची सूचना केली. मंगळवारी लसीकरणाबाबत बैठक पार पडली. देशात लसींचं पुरेसं उत्पादन होतंय त्यामुळे लसींचा साठा करू नका असंही आरोग्य खात्यानं यावेळी म्हटलं आहे.