मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे लसीकरणाचा (Vaccination) वेग देखील वाढला आहे. कारण आज राज्यात विक्रमी 5 लाखाहून अधिक लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. महाराष्ट्राने आज आतापर्यंतची विक्रमी नोंद केली असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 5 लाखांहून अधिक नागरिकांना लसे देण्यात आली आहे. यात आणखी वाढ होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात 3 एप्रिल रोजी 4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण झाले होते. पण आज राज्याने 5 लाखांचा टप्पा आलोंडला आहे. त्यामुळे मुख्ममंत्र्यांनी आणि आरोग्य मंत्र्यांनी सर्वांते अभिनंदन केले आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 43 लाख 42 हजार 716 नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात आजची संख्या मिळविली तर सुमारे 1 कोटी 48 लाखाहून अधिक जणांचं लसीकरण झालं आहे. (Corona Vaccine)


राज्यात आज रोजी 6155 लसीकरण केंद्र आहेत. ज्यामध्ये 5347 शासकीय आणि 808 खासगी केंद्रांचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. लस घेतलेल्या व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी असल्याचं याआधी अभ्यासात पुढे आलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लस घेणं महत्त्वाचं आहे.


संबधित बातमी : Corona : राज्यात गेल्या 6 दिवसात 4 लाख 42 हजार रुग्ण कोरोनामुक्त


देशात आता 1 मेपासून 18 वर्षावरील व्यक्तींना देखील लस घेता येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लसीकरण केंद्रावर अधिक लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी लसीकरण केंद्र वाढवण्याची आवश्यकता आहे. यासाठी सरकार काम करत आहे.