मुंबई : महाराष्ट्रातली कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात आज कोरोनाच्या २२१ नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली कोरोनाग्रस्तांची संख्या १,९८२ वर पोहोचली आहे. २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात एका दिवसात २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मृत्यू झालेल्यांपैकी मुंबईचे १६, पुणे येथील ३ तर नवी मुंबईचे २  आणि सोलापूरचा १ रुग्ण आहे. या २२ जणांमध्ये १३ पुरुष आणि ९ महिला आहेत. ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत. १५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर एकजण ४० वर्षांपेक्षा लहान आहे. मृत्यूमुखी पडलेल्या २२ पैकी २० रुग्णांमध्ये ( ९१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.  यापैकी एकाला मलेरिया देखील होता. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १४९ झाली आहे.


सध्या राज्यात ६१ हजार २४७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात आणि ५०६४  जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.


निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर  शोध घेण्यात येत आहे. यातील ७५५ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी ३७ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, यवतमाळ येथे ७, बुलढाणा जिल्ह्यात ६ , मुंबईत ३ तर प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर मनपा ,हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत.  याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील ६ जण अहमदनगर येथे तर १ जण पिंपरी चिंचवड येथे करोना बाधित आढळले आहेत. 


राज्याच्या कोणत्या भागात किती रुग्ण?