मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजच्या एका दिवसामध्ये राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. दिवसभरात राज्यात कोरोनामुळे २५ जणांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे राज्यातल्या मृत्यूंची संख्या ९७वर गेली आहे. आज महाराष्ट्रात कोरोनाचे २२९ नवे रुग्ण आढळले. यातले एकट्या मुंबईतच कोरोनाचे १६२ रुग्ण वाढले आहेत. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १,३६४ एवढी झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे आज झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १० महिला आहेत. मृत्यू झालेल्या २५ पैकी १२ जण हे ६० वर्षांवरील आहेत. तर मुंबईमध्ये १०१ वर्षाच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांपैकी ११ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील तर दोघे ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्यू झालेल्या २१ रुग्णांमध्ये (८४ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग असे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.


कोरोनाचे १२५ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर ३६,५३३ जण घरगुती क्वारंटाईनमध्ये आणि ४,७६१ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


जिल्हानिहाय आकडेवारी


मुंबई- ८७६ रुग्ण- ५४ मृत्यू


पुणे मनपा- १८१ रुग्ण- २४ मृत्यू 


पिंपरी चिंचवड मनपा- १९ रुग्ण, ० मृत्यू


पुणे ग्रामीण- ६ रुग्ण, ० मृत्यू


ठाणे मनपा- २६ रुग्ण, ३ मृत्यू 


कल्याण डोंबिवली- ३२ रुग्ण, २ मृत्यू 


नवी मुंबई- ३१ रुग्ण, २ मृत्यू 


मीरा-भाईंदर- ४ रुग्ण, १ मृत्यू


वसई विरार- ११ रुग्ण, २ मृत्यू


पनवेल मनपा- ६ रुग्ण, ० मृत्यू


ठाण ग्रामीण- ३ रुग्ण, ० मृत्यू


पालघर ग्रामीण- ३ रुग्ण, १ मृत्यू 


सातारा- ६ रुग्ण, १ मृत्यू 


सांगली- २६ रुग्ण, ० मृत्यू


नागपूर- १९ रुग्ण, १ मृत्यू 


अहमदनगर- १६ रुग्ण, ० मृत्यू


बुलडाणा- ११ रुग्ण, १ मृत्यू


अहमदनगर ग्रामीण- ९ रुग्ण ० मृत्यू 


औरंगाबाद- १६ रुग्ण, १ मृत्यू


लातूर- ८ रुग्ण, ० मृत्यू 


अकोला- ९ रुग्ण, ० मृत्यू


मालेगाव- ५ रुग्ण, ० मृत्यू 


रत्नागिरी, यवतमाळ, उस्मानाबाद, अमरावती- प्रत्येकी ४ रुग्ण, मृत्यू २ (अमरावती, रत्नागिरी)


कोल्हापूर- ५ रुग्ण, ० मृत्यू


उल्हासनगर, नाशिक, नाशिक ग्रामीण, जळगाव ग्रामीण, जळगाव मनपा, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, वाशीम, गोंदिया, बीड, सिंधुदुर्ग- प्रत्येकी १ रुग्ण (मृत्यू- १ जळगाव)


इतर राज्यातले- ८ रुग्ण, ० मृत्यू