मुंबई : कोरोनाचे संकट असल्याने काही जण संधीचे सोने करत आहेत. तर काही जण आपली हौस पुरविण्यात मग्न दिसत आहेत. हौसेला मोल नाही, असाच प्रकार रत्नागिरीत दिसून आला आहे.  कोरोनाबरोबर आता जगायला शिका, असा संदेश जगातील आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे आता कोरोनाविरुद्ध लढा देताना सॅनिटायझर आणि मास्क वापरणे अनिवार्य असणारआहे.  मात्र, रत्नागिरीत एकाने चक्क चांदीचा मास्क बनवून घेतला आहे. ६० ग्रॅम वजनाच्या चांदीत हा मास्क बनवण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. घराबाहेर पडल्यानंतर मास्कचा वापर केला नाही तर गुन्हा दाखल होऊ शकतो. कोरोनाशी लढण्यासाठी आता मास्कची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. आज बाजारात आणि ऑनलाईन मास्कमध्येही विविधता दिसून येत आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे मास्क मिळत आहेत. स्त्रियांसाठी आता प्रत्येक ड्रेसला मॅचिंग असलेले मास्कही मिळू लागले आहेत. 


कोरोनाबरोबर जगायचे असले तरी आता लग्नकार्यात देखील मास्क वापरणे गरजेचे बनणार आहे. कार्यालयात जाण्यासाठीही मास्क बंधनकारक आहे. महिलांची दागिने आणि कपड्यांची हौस कायमच राहणार आहे. त्यात आता नव्याने मास्कची भर पडली आहे. तर काहीही कोरोनाची संधी बघून वेगवेगळे मास्क तयार केले आहेत. यात कोल्हापूर येतील एका सुवर्णकाराने चांदीचा मास्क बनविले. आता काही सुवर्णकारांनी देखील शक्कल लढविली आहे. रत्नागिरीतील एक सुवर्णकार ज्वेलर्सने आता चांदीचा मास्क बनवला आहे. सध्या ६० ग्रॅम वजनाच्या चांदीत हा मास्क बनवण्यात आला आहे. 


रत्नागिरीतील मांडवी येथे रहाणारे शेखर यशवंत सुर्वे यांनी खास कोल्हापूर येथून हा चांदीचा मास्क तयार करुन घेतला आहे. याबाबत माहिती देताना शेखर सुर्वे यांनी सांगितले की एक आवड म्हणून हा मास्क घेतला आहे. तो ६० ग्रामचा असून त्याची किंमत ३९०० रुपये आहे. मी एक फोटो मोबाईलवर पाहिला होता. तसा मास्क मला हवा आहे म्हणून माझ्या ज्वेलर्सला दाखविले. त्यांनी तो कोल्हापूरहून मागवून घेतला १५ दिवसा पूर्वी कोल्हापूरवरुन पाठवून देण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले.