रत्नागिरी : Coronavirus कोरोना व्हायरचं थैमान पाहता आता हा विषाणू अनेक ठिकाणांवर हातपाय पसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतातही कोरोना बाधितांचा आकडा दिवगाणिक वाढत आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त आढळल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. यातच आता रत्नागिरी येथून आणखी एक चिंता वाढवणारं वृत्त हाती आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दापोली तालुक्यात होम क्वारंटाईन असणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बुरोंडी तेलेश्वर इथे ही घटना घडली आहे. २० ते २२ मार्च दरम्यानच्या काळात सदर व्यक्ती मुंबईतील घाटकोपर येथून त्या ठिकाणी गेली होती. ज्यानंतर गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. 


क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे दापोली प्रशासना एकच दहशत आणि गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून खबरदारीचं पाऊल म्हणून या व्यक्तीचे स्वॅब नमुनेही घेण्यात आले. शिवाय मृतदेह नेणाऱ्या दहाजणांनाही कोरोनाची भीती पाहता सावधगिरी म्हणून क्वारंटाईन करण्यात आलं आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी याविषयीची माहिती दिली. 


 


दरम्यान, मृत व्यक्तीच्या मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अफवा न पसरवण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शिवाय सुरक्षिततेचा उपाय म्हणून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. सध्याच्या घडीला दापोली प्रशासनाकडून या परिसरात रस्ते बंदीचा निर्णय घेण्यात आला असून, निर्जंतुकीकरणासाठीची फवारणीही सुरु करण्यात आली