Coronavirus Update : सावधान! राज्यात कोरोना पुन्हा ऍक्टिव्ह, 1956 नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू
Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली असून मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या 2211 वर गेली आहे. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
Mumbai Coronavirus : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या (Corona Update) रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच हवामानातील बदलामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे नवीन रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. गेल्या 7 आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कालच्या तुलनेत आजही देशात कोरोनाचा एक नवीन रुग्ण नोंदवण्यात आला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1590 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रात सध्या 1956 सक्रिय रुग्ण आढळले असून काल (25 मार्च 2023) दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
देशात 24 तासात कोरोनाचे 1590 नवीन रुग्ण
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कालच्या (25 मार्च 2023 )तुलनेत आजही देशात दररोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आज देशात कोरोनाचे 1590 नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गामुळे 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात तीन, कर्नाटक, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याआधी शुक्रवारी देशात कोरोनाचे 1249 नवीन रुग्ण आढळले होते. तर या काळात 2 जणांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच कालच्या तुलनेत आज देशात कोरोनाचे आणखी 341 नवीन रुग्ण आढळले आहेत.
वाचा: पुन्हा अवकाळी संकट! 'या' राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
महाराष्ट्रात दोन जणांचा मृत्यू
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात (Maharashtra Corona Update) शनिवारी कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के इतका आहे. पुण्यात 571 कोरोना रुग्ण सध्याच्या घडीला आहेत. तर त्यानंतर मुंबई आणि ठाण्यात रुग्णांती संख्या जास्त प्रमाणात आहे..
देशात कोरोना बाधितांची संख्या 4,47,02,247
देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 4 कोटी 47 लाख 2 हजार 257 झाली आहे. तर बरे होणाऱ्यांची संख्या 4 कोटी 41 लाख 62 हजार 832 झाली आहे. त्याच वेळी, देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे एकूण 5 लाख 30 हजार 818 लोकांचा मृत्यू झाला आहे.