Coronavirus Update : देशात H3N2 व्हायरस असताना कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा डोकं वर काढलयं. देशात पुन्हा एकदा कोरोनाचे नवीन रुग्ण वाढत आहेत. अलीकडेच दिल्लीत 42  कोरोनाची नवा रुग्णांची नोंद झाली होती. तर महाराष्ट्रात 236 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. देशात कोविड-19 चे सक्रिय रुग्ण सध्या 5,915 वर पोहोचले आहेत. परिणामी केंद्र सरकारने देशातील पाच राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या पाच राज्यांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत रुग्ण बरे झाल्यानंतर बरे झालेल्यांची संख्या 79 लाख 90 हजारांवर पोहोचली आहे. तर राज्यातील मृत्यू दर 1.82 टक्के आहे आणि बरे होण्याचे प्रमाण 98.16 टक्के आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात (Coronavirus In Maharashtra) 1,308 सक्रिय रुग्ण आढळतील. तर दुसरीकडे महाराष्ट्रात 236 नवीन प्रकरणांपैकी 52 राजधानी मुंबईत आले आहेत. तर ठाणे शहरातील 33 जणांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. मुंबई परिमंडळात 109 नवीन प्रकरणे दाखल झाली आहेत. यानंतर पुण्यात 69, नाशिकमध्ये 21, कोल्हापूर आणि अकोल्यात 13-13, औरंगाबादमध्ये 10 आणि नागपुरात 2 रुग्ण आढळले आहेत.


वाचा: गाडीची टाकी फूल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर  


महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात कोरोना विषाणुचे 236 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर राज्यातील संसर्गाच्या रुग्णांची संख्या 81,39,737 झाली आहे. यादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले नाही. तसेच गेल्या 24 तासांत किमान 3834 स्वॅब नमुने तपासण्यात आले आहेत. यानंतर राज्यात आतापर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्यांची एकूण संख्या 8,65,46,719 झाली आहे. दरम्यान महाराष्ट्रात आतापर्यंत 8,65,46,719 नमुने तपासण्यात आले आहेत. एकूण 81,39,737 संक्रमित आढळले आहेत, त्यापैकी 79,90,001 बरे होऊन परतले आहेत. त्याच वेळी, आतापर्यंत 1,48,428 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


तर दुसरीकडे भारतात कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्ययावत केलेल्या आकडेवारीनुसार भारतात 129 दिवसांनंतर एका दिवसात 1,000 हून अधिक नवीन COVID-19 प्रकरणे नोंदवली गेली. यासह, देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 5,915 झाले आहेत. 24 तासांत एकूण 1,071 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, तीन जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 5,30,802 झाली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये राजस्थान आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एक आणि केरळमधील एक रुग्ण आहे.