मुंबई : राज्यात आज पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या या संख्येमुळे टेन्शनही वाढत आहे. आज राज्यात  9 हजार 170 नवीन रूग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात आज दिवसभरात 6 ओमायक्रॉन रूग्ण आढळले आहेत. पुणे ग्रामीणमध्ये 3, पिंपरी-चिंचवडमध्ये 2 तर पुणे महापालिका हद्दीत एक रूग्ण आढळून आला आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन रूग्णांची संख्या 460वर जाऊन पोहचली आहे.



दुसरीकडे मुंबईत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबईत दिवसभरात 6 हजार 347 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईसह राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत मुंबई नवे 919 रुग्ण वाढले आहेत


5 हजार 712 रुग्णांमध्ये लक्षणं आढळली नाहीत. दिलासादाक बाब म्हणजे दिवसभरात फक्त एकाच रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी तूर्तास लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाही. 


आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी जनतेला दिलासा दिला आहे. लॉकडाऊनचा विचार नाही, मात्र निर्बंध कडक करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कोरोना रुग्णसंख्या 15 हजारावर पोहचेल, अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली.