नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात एका व्यक्तीने लाखो रुपये खर्च करुन सोन्याचं मास्क बनवलं आहे. हे अनोखं मास्क पुण्यातील एका व्यक्तीने जवळपास 3 लाख रुपयांना बनवलं आहे. सध्या या व्यक्तीची, त्याच्या सोन्याची मास्कची मोठी चर्चा होताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हौसेला मोल नसतं, असं म्हटलं जातं ते खरंच, असंच या हौशी व्यक्तीसाठी म्हणावं लागेल. पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे राहणारे शंकर कुराडे यांनी तब्बल 2.89 लाख रुपयांना सोन्याचं मास्क बनवलं आहे. पण या मास्कमुळे संसर्गापासून संरक्षण होणार का? या सोन्याच्या मास्कमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो का? असे अनेक प्रश्नदेखील अनेकांकडून विचारले जात आहेत.


याबाबत शंकर कुराडे यांनी सांगितलं की, हे एक पातळ मास्क आहे आणि याला छोटं छिद्र आहे. छिद्र असल्यामुळे या मास्कमधून श्वास घेण्यास कोणताही त्रास होत नाही. परंतु कोरोना व्हायरसपासून हे मास्क बचाव करु शकतं की नाही ते सांगू शकत नसल्याचं ते म्हणाले.



शंकर कुराडे यांना सोन्याचे दागिने घालण्याची आवड आहे. ते अनेक, मोठे दागिने घालूनच बाहेर फिरतात.


'१५ ऑगस्टपर्यंत देशी लस आणायचा ICMR चा अट्टाहास धोकादायक आणि मूर्खपणाचा ठरेल'