पुणे : Coronavirus in Pune : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पुण्यामध्ये कठोर निर्बंध लागण्याची शक्यता आहे. कोरोना निर्बंधांबाबत आज निर्णायाची शक्यता आहे. दरम्यान, ओमायक्रॉनमुळे राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे. (Possibility of strict restrictions in Pune)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक, मॉल, उद्याने, शाळांबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानुसार सार्वजनिक वाहतूक, उद्याने, मॉल आणि शाळांबाबत कठोर निर्बंध घालण्याबाबत चर्चा होणार आहे. आज पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती होणाऱ्या आढावा बैठकीत यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. 


दरम्यान, कोरगाव भीमा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर कडक पावले उचलण्यात येतील असे संकेत दिले होते. त्यामुळे आज होणाऱ्या आढावा बैठकीत कडक निर्बंधाबाबत ते निर्णय घेण्याची शक्यता आहे.



 कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नियमांचे भान ठेवले पाहिजे. लग्नसमारंभ आणि अशा प्रकारचे समारंभ मोठ्या स्वरूपात व्हावेत असे प्रत्येकाला वाटते. परंतु, कोरोनाच्या नवीन स्वरूपात आलेल्या विषाणूचा संसर्ग वेगाने होतो ही बाब लक्षात घेतली पाहिजे, असे अजित पवार यांनी याआधीच स्पष्ट सांगितले.