बीड : कोरोना व्हायरसची अफवा पसरवणाऱ्या दोघांवरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टीमध्ये कोरोणाचा रुग्ण आढळला आहे,  व्हाट्सअपला स्टेटस ठेवणाऱ्या आणि पोस्ट व्हायरल करणारा अशा दोघांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अशा खोट्या अफवावर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवणाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, दरम्यान, कोरोना व्हायरसची अफवा पसरवणाऱ्या एकावर पुण्यात पहिला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एका हॉटेलमध्ये कोरोनाचे रुग्ण आल्याची खोटी माहिती दिली होती. पुण्याच्या विभागीय आयुक्तानी याबाबत पडताळणी केली. यावेळी ही माहिती खोटी असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी खोटी माहिती देणाऱ्या एकावर कोरेगाव पार्क पोलीस स्टोशनमध्ये गुन्हा दाखल केला गेला आहे.



आष्टी शहरातील एका युवकाच्या फोटोवर कॅप्शन लिहून कोरोनाची अफवा पसरवली आणि त्याची पोस्ट तयार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथे कोरोनाचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळला, अशी रुग्णाचे नाव आणि फोटोसह खोटी बातमी व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून पसरवणात आली होती. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. एम. सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली.


या बाबत व्हॉट्सअप स्टेटसमध्ये ज्या व्यक्तीचे नाव आणि फोटो वापरला होता त्याने पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढचा तपास सुरु आहे.