सोलापूर : पंढरपूर येथील जीवघेण्या हल्ल्यात अपक्ष नगरसेवक संदिप पवार यांचा मृत्यू झालाया. पंढरपूर येथे झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात आले होते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपचारादरम्यान संदीप पवार यांचा मृत्यू झालाय. पंढरपुरातील गजबजलेल्या स्टेशनरोड परिसरात अपक्ष नगरसेवक संदिप पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.


हॉटेल श्रीराममध्ये त्यांच्यावर दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला तसंच कोयत्यानं वार केले. ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी झालेल्या या हल्ल्यामुळे आणि संदीप पवार यांच्या मृत्यूमुळे पंढरपूर शहर हादरून गेलं.


हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.