नाशिक : नाशिकची लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकरला एसीबीने अटक केली आहे. वैशाली झनकरला आठ लाखांची लाच घेण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत विभागाला गुंगारा देत झनकर फरार होती. कल्याण आणि नाशिक जिल्ह्यात झनकरकडे कोट्यवधींची मालमत्ता आढळली आहे. झनकरच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेले बहुतेक सर्व निर्णय संशयाच्या भोव-यात आहेत. सर्व प्रकरणांची चौकसी करण्याची मागणी केली जाते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- ठाणे येथील एका शिक्षण संस्थेकडून 8 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी वीर यांच्यासह शिक्षक पंकज दशपुते आणि वाहनचालक ज्ञानेश्वर येवले भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली वीर जनकर यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतलीये. ठाणे लाचलुचपत विभागाला गुंगारा देत  फरार झालेल्या या शिक्षणाधिकारी आठ लाख रुपये लाच घेताना त्यांच्या ड्रायव्हर आणि एका शिक्षकासह छाप्यात रंगेहाथ सापडलयायेत. त्यांच्या नावे मुरबाड, कल्याण रोड, सिन्नर नाशिक गंधारे आणि गंगापूर रोड अशा चार ठिकाणी फ्लॅट आहेत तर कल्याणमध्ये मोठी गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आढळून आल्याने लाचलुचपत विभागाने त्यांच्याबद्दल काही तक्रारी असल्यास नागरिकांना आवाहन आवाहन केले आहे. 


नाशिकच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर आठ लाखांची लाच घेताना फरार झालेले असतानाच नगर जिल्ह्यात एका प्राचार्याला दीड लाखाची लाच घेताना अटक करण्यात आलीये. बी एच एम एस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र इंटर्नशिप केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी श्रीरामपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. या महाविद्यालयातील ्रभारी प्राचार्य बापूसाहेब हरिश्‍चंद्र व लिपिक भारती बापूसाहेब इथापे यांना अटक करण्यात आलीये. या दोन घटनांमुळे प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण विभागात सुरू असलेला भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे हे समोर आलेय.