परमबीर सिंग यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांना दिले 14 पानी पत्र
भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती
अकोला : अकोल्याच्या नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक भीमराव आर घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.. 20 एप्रिलला त्यांनी 14 पानाचे एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पोलीस महासंचालक, महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना पाठवलं आहेय.
या पत्रात त्यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहेय. परमबिर सिंह हे ठाणे शहर पोलिस आयुक्त असतांना त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप पोलीस निरीक्षक घाडगे यांनी केला आहेय.
परमबिर सिंग यांनी फ्रांसिस डिसिल्वा आणि प्रशांत पाटील या पोलिस कर्मचाऱ्यांना 20 वर्षापासून त्यांच्या कामासाठी सोबतच ठेवले असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
या दोन्ही कर्मचाऱ्यांना परमबिर सिंग यांची बेनाम संपत्ती कुठे आहे हे संपूर्ण माहिती असल्याचं ही पत्रात उल्लेख करण्यात आलं आहे. परमबिर सिंग यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेनाम संपत्ती म्हणजे 21 एकर शेत दुसऱ्या नावाने खरेदी केली असल्याचे पत्रात लिहलं आहे. पोलीस निरीक्षक घाडगे यांनी 2015 आणि 2016 यावर्षी सुद्धा परमबीर यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.
याआधी पोलीस आयक्तांक़डून 30 मार्चला अहवाल देण्यात आला होता. 1 एप्रिल रोजी चौकशीचे आदेश काढण्यात आले होते. अहवालात परमबीर सिंह यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
परमबीर यांच्यावर खालील मुद्द्यांवर चौकशी
सचिन वाझे आणि परमवीर सिंग यांच्यातील संबंधावर होणार चौकशी
अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणात परमवीर सिंग यांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात कसूर केली का?
या स्फोटक प्रकरणी अधिवेशन सुरू असताना तातडीने राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात परमवीर सिंग यांनी निष्काळजी पणा दाखवला का?
परमवीर सिंग यानी अखिल भारतीय सेवा नियमांचा भंग केला आहे का?