सातारा : भ्रष्टाचाराचे आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी फेटाळले आहेत. माझ्यावर केलेले ५० लाख भ्रष्टाचारांचे आरोप कधीही सहन करून घेणार नाही ,दात टोकरून पोट भरणे ही आमची संस्कृती नाही, असे ते म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी कोणतीही अपेक्षा न करता राजकारण करतो, मलाही आता राजकारणाचा कंटाळा आलाय, मलाही व्यक्तीगत आयुष्य आहे. जनतेची काळजी घेईल, असा मला एक माणूस दाखवा मी लोकसभेचा अर्जही भरणार नाही, असे थेट आव्हान विरोधकांना खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले.


सातारा येथे उदयनराजे यांनी  पत्रकार परिषद घेत भ्रष्टाचार आरोपाचे खंडन केले. भ्रष्टाचाराचे आरोप कधीही सहन करून घेणार नाही. दात टोकरून पोट भरणे हे आमची संस्कृती नाही. हे करणारे  कोणाचे बगलबच्चे आहेत ते सर्वांना माहिती आहेत. यांचेच बगलबच्चे आज खंडणी आणि दरोड्याच्या गुन्हात आत आहेत.  


दरम्यान, नारायण राणे यानी नवीन पक्ष काढला आहे त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया देण्याइतपत मी मोठा नाही, असे सांगत   शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. माझ्याबद्दल. चुकीच्या बातम्या जनतेत पोहचविल्या जात आहेत, असे ते म्हणालेत.  


दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. दरम्यान, उदयनराजे यांनी अनेकवेळा राष्ट्रवादीवर जाहीरपणे तोंडसुख घेतले होते. तसेच राष्ट्रवादीबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती.


काल मुंबईत उदयनराजे यांनी पवार यांनी भेट घेतली होती. यावेळी चर्चा केली. मात्र, चर्चेचा तपशील समजू शकलेला नाही. पुण्यापासून पवार आणि उदयनराजे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. पुणे ते सातारा असा प्रवास चक्क शेजारी बसून केला.