COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय पवार, झी मीडिया, सोलापूर: सोलापूरच्या हद्दवाढ भागात पाणीपुरवठा करणाऱ्या ठेकेदारांनी आणि पालिकेतील अधिकाऱ्यांनी मिळून लाखो रुपयांचा अपहार केल्याचं भाजप नगरसेवकांनी उघड केले आहे. अपहाराची ही व्याप्ती कोट्यवधींच्या घरात गेली असून, हा अपहार कसा झाला याचे पुरावेच आयुक्तांसमोर मांडण्यात आले आहेत. सोलापूर महानगरपालिकेची हद्द वाढ झाल्यापासून इथले नागरिक महापालिकेचे सर्व कर नियमानुसार भरतात.. मात्र या नागरिकांना कोणत्याही मुलभूत सुविधा देण्यात आल्या नाहीत.


पाणी वाटपात मोठा घोळ


दरम्यान,  शहरातील काही भागात पाण्याची सुविधा नसल्यानं या  भागांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा केला जातो. तब्बल आठ विभागात पाण्यासाठी वर्षाला १५ लाखांची तरतूद करण्यात आलीये. मात्र टँकर माफया आणि पालिकेतील अधिकाऱ्यांनी मिळून पाणी वाटपात मोठा घोळ केल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे. टँकर माफीया आणि पालिकेतील अधिकाऱ्यांनी  केलेल्या या गैरव्यवहाराचे पुरावे नगरसेवकांनी पालिका आयुक्तांच्याकडे सादर केलेत.. आता पालिका प्रशासनानं या प्रकरणाची चौकशी सुरु केली असून लवकरच दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं.


कारवाईकडे सोलापूरकरांचे लक्ष


सत्ताधारी पक्षाच्यात नगरसेवकाने पुरावे सादर केल्याने आता दोषींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.