पालघरच्या कारखान्यात होते बनावट नोटांची छपाई; आठ कोटी सापडल्यावर क्राईम ब्रांचने लावला छडा
शनिवारी ठाणे क्राईम ब्रांचने 8 कोटी रुपये जप्त करत दोघांना अटक केली होती. चौकशीत त्यांची पाळंमुळं पालघरपर्यंत पोहोचल्याचं समोर आलं आहे.
हर्षद पाटील, झी मीडिया, ठाणे : शनिवारी ठाणे क्राईम ब्रांचने(Thane Crime Branch) आठ कोटी रुपयांच्या बनावट नोटा(Counterfeit notes) जप्त केल्या. आठ कोटींची रोकड सापडल्यानंतर क्राईम ब्रांचने या संपूर्ण प्रकाराचा छडा लावला आहे. पालघरच्या कारखान्यात(Palghar factory) या बनावट नोट्या छापल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे. बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड क्राईम ब्रांचने केला आहे.
या कारखा्यात या नोटा छापल्या गेल्या
पालघरमध्ये बनावट नोटांची छपाई होत असल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. शनिवारी ठाणे क्राईम ब्रांचने 8 कोटी रुपये जप्त करत दोघांना अटक केली होती. चौकशीत त्यांची पाळंमुळं पालघरपर्यंत पोहोचल्याचं समोर आलं आहे. सातपाटी रोड अल्याळी इथल्या हायटेक इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये कारखाना आहे. या कारखा्यात या नोटा छापल्या गेल्या आहेत. या कारखान्याला परवानगी एका उत्पादनासाठी आहे. आणि उत्पादन वेगळंच सुरु असल्याचं समोर आल आहे.
एका कारखान्यात या नोटांची छपाई होत असल्याचं उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या नंतर प्रशासनाचा सावळागोंधळ उघड झाला आहे. पालघर सह बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात हजारो कारखाने असून परवानगी एका उत्पादनाची आणि प्रत्यक्षात उत्पादन मात्र दुसऱ्याच वस्तूंचं घेतलं जातं असल्याचं धक्कादायक वास्तव तपासादरम्यान समोर आलं आहे.