औरंगाबाद : व्यक्ती प्रेमात आकंठ बुडालेला असला / असली की त्यांना जगाची काय तर कशाचीच तमा नसते. हे आपण अनेकदा ऐकलं असेल. काहींनी हेच सांगणारी दृश्यही प्रत्यक्षात पाहिली असतील. पण, प्रेमाचं एक वेगळं रुप नुकतंच औरंगाबादमध्ये पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठी वर्दळ असणाऱ्या जालना रस्त्यावरील हे दृश्य पाहून अनेकांना धक्काच बसला. 



सोशल मीडियावर यासंबंधीचा व्हिडीओही व्हायरल झाला. जिथे एका दुचाकीवर तरुण आणि तरुणी अश्लील चाळे करताना दिसले. 


तरुणीला बाईकवर घेऊन या तरुणानं दुचाकी चालवत नेली. यावेळी तो तिला किसही करताना दिसला. 


दुचाकी चालवत असतानाच त्यांचे सुरु असणारे चाळे पाहून बघ्यांमध्येही एकच चर्चा झाली. काहींनी या प्रकरणात संताप व्यक्त केला. 


व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संपात व्यक्त केला. ज्यानंतर पोलिसांनीही व्हिडीओची दखल घेतली. 


दुचाकीवर असणारं ते युगूल नेमकं कोण होतं, याचा तपास घेण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरु केल्या आहेत. 


वर्दळीच्या रस्त्यावरून जाताना अशी कृत्य करणं, स्वत:सोबतच इतरांचाही जीव धोक्यात घालणं या सर्व गोष्टींची दखल कायदेशीररित्या घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.