पुणे : पुण्यात एका जोडप्यानं त्यांच्या चार वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाणेर-पाषाण लिंक रोड परिसरातली ही घटना आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या जयेश पटेलनं त्याची पत्नी भूमिका आणि चार वर्षांचा मुलगा नक्ष यांच्यासह आत्महत्या केलीय. 


आई-वडिलांनी दोघांनीही गळफास लावून घेतला. तर मुलाच्या तोंडातून फेस येत होता. या आत्महत्येचं कारण नेमकं कळू शकलेलं नाही.


पण जयेश आणि भूमिका यांचा चार वर्षांचा मुलगा नक्ष सतत आजारी असायचा, अशी माहिती आहे.