पुणे :  तुम्हाला जर गर्लफ्रेंड (GirlFriend) किंवा बॉयफ्रेंड  (BoyFriend) असेल आणि तुम्ही पुण्यात राहात असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी. कारण पुण्यात कपल्सविरोधात एक निर्णय घेण्यात आलाय. (couples banned from gardens in pune) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा रोमान्स एन्जॉय करायचा असेल तर पुण्यातला पाषाण तलाव परिसर म्हणजे एक नंबर. काय तो तलाव. काय ती झाडी. आणि काय तो एकांत. एकदम ओक्के. पण आता काही इथं रोमान्स करता येणार नाही. 


थेट तसा बोर्डच महापालिकेनं लावलाय. कपल इज नॉट अलाऊड. पाषाण तलावात आत्तापर्यंत दोन मृतदेह आढळून आले आहेत. पाषाण तलाव परिसरात प्रेमी जोडप्यांमध्ये भांडणं होऊ शकतात, त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही बंदी घातल्याचं सांगण्यात येतंय.  


तरुणांना मात्र ही बंदी मुळीच मान्य नाही. फिरायला येणारे भाऊ-बहीण आहेत, मित्र-मैत्रिण आहेत की कपल आहे हे ठरवणारे तुम्ही कोण, असा त्यांचा सवाल आहे.


पाषाण तलाव परिसर हा निसर्गरम्य आणि सुंदर आहे. तलावाकाठी बसून चार प्रेमाचे, सुखाचे क्षण साजरे करावे, याचा मोह होणं अगदी स्वाभाविक. तिथं काही संशयास्पद घडत असेल तर सीसीटीव्ही किंवा सुरक्षा वाढवणं शक्य आहे का, याचा विचार करायला हवा.  सरसकट लव्ह बर्डसना नो एन्ट्री करुन प्यार के दुश्मन होण्यात काय अर्थ आहे.