मुंबई : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना ५० कोटी रूपये न्यायालयात भरण्यास डीएसकेंना पुन्हा एकदा अपयश आलंय. 


उद्या कोर्टात हजर राहण्याचे आदेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळं मुंबई उच्च न्यायालयानं कडक शब्दांत खडसावत डीएसकेंना उद्या हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. डीएसकेंच्या वकिलांनी न्यायालयाकडे आणखी वेळ मागितली आहे. डीएसकेंच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी झाली. आंतरराष्ट्रीय बँकांनी मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता अजून झालेली नाही. 


डीएसकेंना कोर्टाचा प्रश्न


ऑडीट रिपोर्टचीही पूर्तता अजून झालेली नाही. त्यामुळे मालमत्तांचा लिलाव का करत नाही, असा सवाल न्यायालयाने डीएसकेंना विचारलाय. तसंच डीएसके न्यायालयाची फसवणूक करत असल्याचं सांगत न्यायलयानं डीएसकेंच्या वकिलांना फटकारलंय. 


चौकशीसाठी रहावे लागणार हजर


डीएसके यांना ७ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते १ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत पुण्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. या बरोबरच येत्या १३ फेब्रुवारीला डीएसके यांना मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीस हजर रहावे लागणार आहे.