नागूपर : कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. पुणे शहरात कोविड-१९ रुग्णांचा आकडा एक लाखाच्या पुढे केला आहे. आता नागपुरात कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे. गुरुवारी दिवसभरात नागपुरात १ हजार ७२७ नवे रुग्ण आढळून आलेत. आतापर्यंतची नागपुरातील दिवसभरातली ही सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे. तर ४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या नव्या रुग्णांसह नागपुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३४ हजार ४३२वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे नागपुरात १ हजार १७७जणांचा बळी गेला आहे.


कोविड-१९ । पुण्याची चिंता वाढवणारी बातमी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरातील कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी मुंबईतील तज्ज्ञांची एक टीम आज विशेष विमानाने नागपुरात दाखल होणार आहे. या टीममध्ये मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्यासह डॉ. हेमल शहा, डॉ राहुल पंडीत, डॉ मुफझल लकडावाला, डॉ गौरव चतुर्वेदी यांच्यासह इतर तज्ज्ञांचा समावेश आहे. धारावी, कोळीवाड्यातील कोरोनावर नियंत्रम मिळवल्यानंतर त्याच धर्तीवर नागपुरात उपाययोजना करण्याबाबत ही टीम मार्गदर्शन करणार आहे. 



दरम्यान, विदर्भातील अमरावतीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अमरावतीत कोरोनाचे २०५ नवे रुग्ण आढळलेत. जिल्ह्यात एकूण ६ हजार ३२१ कोरोनाग्रस्त आहेत. अमरावतीमध्ये एकूण १४० जणांचा बळी गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ७६३ जणांनी कोरोनावर मात केलीय, तर १ हजार ४१८ जणांवर उपचार सुरू आहेत.