महाराष्ट्रात 24 तासांत कोरोनाचे 9677 नवे रूग्ण; डेल्टा प्लसने चिंता वाढवली
रत्नागिरीत डेल्टा प्लस वेरिएंटमुळे महिलेचा मृत्यू, राज्यातील पहिली नोंद
मुंबई : राज्यात शुक्रवारी कोविड-19 चे 9 हजार 677 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या वाढून 60,17,035 राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा गेला आहे. गेल्या 24 तासांत 156 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. हा एकूण आकडा 1,20,370 इतका झाला आहे. (Covid-19 Maharashtra Update : New 9677 Coronavirus cases found; Delta plus variant first case found ) तर 10 हजार 138 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशभरात कोरोना डेल्टा प्लस वेरिएंटचे 51 नवे रूग्ण सापडले आहे. यामधील सर्वाधिक रूग्ण म्हणजे 22 रूग्ण हे महाराष्ट्रातच सापडले आहे.
डेल्टा प्लसमुळे पहिला मृत्यू
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमधील डेल्टा प्लसमुळे पहिल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीत सिविल रूग्णालयात एका ज्येष्ठ महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू जाला. रत्नागिरीतील अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितलं की, ही महिला संगमेश्वरची राहणारी होती.
10,138 कोरोनाबाधितांनी कोविड-19 वर केली मात
महाराष्ट्रात आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, 156 मृत्यूंपैकी 117 रूग्णांचा मृत्यू 48 तासांत झाला आहे. तर 39 कोरोनाबाधितांचा मृत्यू हा गेल्या एक आठवड्यात झाला आहे. यानुसार मृतांचा एकूण संख्या ही 355 एवढी झाली आहे.