मुंबई : Coronaviru in Maharashtra :1 फेब्रुवारी 2022 पासून कोविड संसर्ग रोखण्यासंदर्भातील राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सुधारीत आदेश लागू केले आहे. (Maharashtra Corona Rules) त्यानुसार राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली नवी नियमावली आजपासून लागू करण्यात येणार आहे. 


आजपासून नवी नियमावली लागू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसीकरण अधिक झालेल्या जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या आदेशाचा 11 जिल्ह्यांना फायदा होणार आहे.  ज्या आस्थापना सुरु होतील, तेथील कर्मचाऱ्यांचं पूर्ण लसीकरण झालेले आवश्यक आहे. तसेच येणाऱ्या ग्राहकांचं देखील लसीकरण झालेलेअसणं आवश्यक आहे. येत्या काळात कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन नवे आदेश लागू केले जाणार आहेत.आजपासून नवी नियमावली मुंबई, पुणे, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली. कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये लागू होईल.



दरम्यान, राज्यात डिसेंबर अखेर आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीच्या पंधरावड्यात कोरोनाची (Corona) वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येमुळं निर्बंध (Corona Restrictions) लागू केले होते. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने राज्य सरकारनं निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या डोसचे 90 टक्के आणि दुसऱ्या डोस घेणाऱ्यांचं 70 टक्के लसीकरण झाले आहे. तसेच याशिवाय 15 ते 18 वयोगटातील मुलांचे राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाण लसीकरण झाले आहे, अशा जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.


काय सुरु होणार?


लसीकरण अधिक झालेल्या जिल्ह्यांना निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. त्या जिल्ह्यातील 90 टक्के लोकांचा पहिला डोस पूर्ण हवे आहेत. जिल्ह्यात 70 टक्के लोकांचे दोन्ही डोस पूर्ण हवेत. राज्य सरकारच्या नव्या आदेशाने चौपाटी, गार्डन सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.


- सर्व राष्ट्रीय पार्क आणि सफारी
- पर्यटन स्थळ पुन्हा सुरू होणार
- ऑन लाईन तिकीट बुकिंग होणार
- एस्सल वर्ल्डसारखे पार्क 50 टक्के क्षमतेने
- स्विमिंग पूल,वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेनं सुरु
- हॉटेल,थिएटर 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
- सलून, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु
- लग्नासाठी 200 जणांना परवानगी
- अंत्यविधीसाठी कोणतीही मर्यादा आली
- सर्व कार्यक्रमांना 50 टक्के क्षमतेनं परवानगी
- स्थानिक प्रशासनाच्या वेळेनुसार बीचेस, गार्डन, पार्क खुली होणार
- अम्युजमेंट/थीम पार्क 50 टक्के उपस्थितीत खुली होणार
- वॉटर पार्क, स्विमिंग पूल 50 टक्के उपस्थिती 
- सलून आणि ब्युटी पार्लर च्या नियम प्रमाणे स्पा  50 उपस्थिती 
- रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृह 50 टक्के उपस्थिती 
- भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के उपस्थिती 
- खेळाच्या स्पर्धा लोकांची 25 टक्के उपस्थिती
- नाईट कर्फ्यू रात्री 11 ते सकाळी 5