अमर काणे / नागपूर : कोरोनाच्या (Coronavirus) संकटात  राजकारण न करता  रुगांच्या मदत करा  अस सांगितलं जातं. मात्र कृतीत फारस दिसत नाही. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) केवळ आवाहन करुन थांबले तर त्यांनी कृतीतून ते दाखवून दिले. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये  डॉ. राहुल नरोडी यांचे  हॉस्पिटल आहे. (Narodi Hospital at Hinganghat in Wardha) येथे सध्या कोविड रुग्णांसाठी 10 बेड होते.  त्यांना किमान अजून 25 बेडची परवानगी  मिळत नव्हती. सर्व प्रयत्न करूनही जिल्हा प्रशासन परवानगी देत नाही म्हणून  डॉ. निरोडी यांनी  स्थानिक मनसे नेत्यामार्फत मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी (Hemant Gadkari) यांच्याकडे आपली व्यथा मांडली. मनसे नेता हेमंत गडकरी यांनी रुग्णांना तातडीने मदत मिळावी म्हणून याबाबत पक्षीय वैचारिक मतभेद दूर ठेऊन आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरिकडे  यांना याबाबत सांगितले आणि मदत मागितली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन गडकरी यांनी  त्वरित जिल्हाधिकारी वर्धा यांना फोन करुन 25 बेडची परवानगी  मिळवून दिली. इतक्यावरच न थांबता  नितीन गडकरी यांनी  तुमच्या कडे सध्या किती व्हेंटिलेटर आहेत असे डॉ.नरोडी यांना विचारले. डॉ. नरोडी यांनी दोन व्हेंटिलेटर आहेत असे सांगताच मी अजून  दोन व्हेंटिलेटर देतो हेमंत ताबडतोब घेऊन जा आणि  रुग्णसेवेसाठी कामात आणा असे सांगितले आणि लगेच जवळपास 25 लाखांचे दोन व्हेंटिलेटर आणि मेडिकल साहित्य सुपूर्द केले.


नितीन गडकरी यांच्याकडे, आम्ही बेड वाढवून घेण्यासाठी आलो ते काम तर झालेच पण सद्या दुर्मिळ पण अत्यावश्यक बाब असलेले दोन व्हेंटिलेटर  आणि इतर साहित्य (अंदाजे किंमत 25 लाख) हे मिळाल्याबद्दल हिंगणघाट येथील डॉक्टर यांचा आनंद गगनात मावेना झाला. जनतेच्या सेवेकरता मेनसेचे हेमंत गडकरी यांनी  भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागितलेली मदत आणि नितीन गडकरी यांनी मदत करण्यासाठी दाखल दाखवलेली तत्परता इतर राजकारण्यांची आदर्शवत आहे.